शनिवार, १२ जुलै, २००८

चिऊचं पिल्लू शाळेत !

चिऊचं पिल्लू शाळेत गेलं
पाटी-पेन्सिल विसरून आलं
कावळे गुरूजी रागावले
काव-काव करत ओरडले
चिऊचं पिल्लू खूप भ्यालं
रडत रडत घरी पळालं
चिऊ म्हणाली,"झालं काय?
देते बाळाला दुधाची साय."
दुधाच्या नावानं आलं खुशीत
हळूच शिरलं आईच्या कुशीत !

- अनामिका.