बुधवार, १२ नोव्हेंबर, २००८

राम जाहली सीता

खरं पहायला जाता,गजल प्रकारातलं मला जास्त काहीच माहिती नाही, पण तरीही मानस६ यांच्या 'आज फुलांची भाषा...' या गजलेवरून ही गजल बेतण्याचा एक तोडकामोडका प्रयत्न करून पाहिला आहे.

आज मुलांची भाषा मजला कळते आहे !
'हो'च धरोनि उत्तर, मी हिरवळते आहे !

उष्म उसासे टाकीत आली, झुळूक कशी ही?
तुझी आस का ही अंतरी घुटमळते आहे?

शांत मन्मनी या कसल्यासे गंधित लाटा?
आज काय हे माझ्या मनी खळबळते आहे?

आज जरी मी काही तुजला पुसलेच नाही
का मनाशी तरी ही लाज चुरगळते आहे?

आज वाल्मिकी पुन्हा करा सुरवात नव्याने,
राम जाहली सीता, भाग्य फळफळते आहे !

- वेदश्री.