गुरुवार, १२ जानेवारी, २००६

पाण्याखालची रांगोळी

साहित्य : विविध रंगाची रांगोळी, पॅराफीन मेण, मोठा काठ असलेली थाळी.

कृती : गॅसवर थाळी गरम करून घ्यावी. तळाशी मेणाचा बारीक थर लावावा. रांगोळीची नक्षी एका पातळ कागदावर काढून घ्यावी. तो कागद थाळीवर ठेवावा. त्यानंतर शाई संपलेल्या रिफीलने किंवा तत्सम वस्तूने थोडा दाब देत ती नक्षी मेणावर कोरून घ्यावी व कागद काढून घ्यावा. नक्षीच्या बाह्य ओळी मेणात तयार होतील, त्यात रांगोळीचे रंग भरावेत. फार गडद रंग वापरणे टाळावे. रंग भरल्यावर ती थाळी पुन्हा तापवावी. मेण ती रांगोळी शोषून धरेल. थाळी थंड झाल्यावर थाळीत पाणी घालावे. झाली पाण्याखालची रांगोळी तय्यार !

- वेदश्री.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा